Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Webdunia
शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (15:12 IST)
राज्य शासनाने 5 वर्षे मुदतीचे 1000 कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहे. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.
 
रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. भारतीय राज्य घटनेनुसार कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मंजुरी घेण्यात आली आहे.
 
दि. 16 मे 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.
 
भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 08 फेब्रुवारी, 2022 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 08 फेब्रुवारी, 2022 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.
यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत.
 
अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 09 फेब्रुवारी, 2022 रोजी करण्यात येईल.
 
यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 09 फेब्रुवारी, 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी 05 वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी  दि. 09 फेब्रुवारी, 2027 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कुपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या प्रतिवर्षी दिनांक 09 ऑगस्ट आणि 09 फेब्रुवारी रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.
 
शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या ३ फेब्रुवारी 2022 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

पुढील लेख
Show comments