Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समृद्धी महामार्ग : दररोज धावताय एवढी वाहने; सुरक्षेसाठी या आहेत उपाययोजना आणि सुविधा

Webdunia
सोमवार, 19 डिसेंबर 2022 (16:43 IST)
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान यांचे हस्ते संपन्न झाला. त्यानंतर हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरुन दररोज सरासरी १० ते १२ हजार वाहने प्रवास करत आहेत व दिवसेंदिवस ही संख्या वाढत जाणार आहे. महामार्गावरुन प्रवास करतांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील उपाय योजना केलेल्या असल्याची माहिती औरंगाबाद येथील म.रा.र.वि. महामंडळाचे मुख्य अभियंता बी.पी. साळुंके यांनी दिली.
 
२१ ठिकाणी शीघ्र प्रतिसाद वाहने
- अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी इंटरचेंजवर २१ ठिकाणी सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहने – QRV वाहने
उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
- अपघातग्रस्त वाहन द्रुतगती मार्गावरुन बाजूला नेण्यासाठी १३ ठिकाणी क्रेनची सोय केलेली आहे.
- अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण १५ रुग्ण वाहिका आहेत. रुग्णवाहिका स्थानिक रुग्णालयांशी संलग्न
ठेवण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरिता १०८ क्रमांकावर संपर्क साधता
येतो.
- सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस (Highway Safety Police) तैनात आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य
सुरक्षा महामंडळाचे (MSSC) एकूण १२१ सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त
केलेले आहेत.
 
अपघात झाल्यास हेल्पलाईन
- वाहनांचा बिघाड / अपघात झाल्यास २४ तास हेल्पलाईन क्रमांक 1800 233 2 233/ 81 81 81 81
५५ कार्यरत असून सदर हेल्पलाईन क्रमांक महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.
प्रवासाला निघण्यापुर्वी आपल्या मोबाइल मध्ये सदर क्रमांक कृपया जतन करावेत.
- नागपूर ते शिर्डी दरम्यान समृद्धी महामार्गावर प्रत्येक इंटरचेंजच्या ठिकाणी स्वंतत्र नियंत्रण प्रणाली असून ते
मुख्य नियंत्रण कक्षाशी संलग्न आहेत. औरंगाबादमधील सांवगी इंटरचेंज येथे मुख्य नियंत्रण कक्ष स्थापित
करण्यात आलेला असून नियंत्रण कक्षातून २४ तास सर्व सुविधा यंत्रणावर बारकाईने लक्ष दिले जाते.
 
महामार्गावर या सुविधाही
- नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी तर शिर्डीहुन नागपूरच्या दिशेने जातांना ६ ठिकाणी अशा एकूण १३
ठिकाणी इंधन भरण्यासाठी पेट्रोल-डिझेल पंपची सोय करण्यात आली आहे. याच ठिकाणी प्रसाधनगृह,
खानपान सेवा, टायर पंक्चर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी व वाहनांची किरकोळ दुरुस्तीची
सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा उपलब्ध आहे.
- याशिवाय १६ ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा (Way side Amenities) सुरु करण्याची प्रक्रिया सुरु
असून लवकरच प्रवाशांसाठी ती उपलब्ध करुन दिली जाईल.
 
वाहनधारकांनो इकडे लक्ष द्या
- सुरक्षित प्रवासासाठी वाहन चालकांनी खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे :-
अतिवेगामुळे काही ठिकाणी अपघात झालेले असून, त्याअनुषंगाने सर्व जनतेस व वाहनधारकांना आवाहन व
विनंती करण्यात येते की,
i. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाचे इंजिन, इलेक्ट्रीक वायरिंग, टायर्स इ. सुस्थितीत असण्याची खात्री
करावी.
ii. वाहनाची गती विहित मर्यादित ठेवावी व लेनची शिस्त पाळावी.
iii. चूकीच्या बाजूने वाहने ओव्हरटेक करु नये.
iv. मुख्य मार्गिकेवर वाहने पार्क करु नये.
v. दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
vi. सीट बेल्ट वापरणे इ. बाबींचे जाणीवपूर्वक व काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

माजी भारतीय पोलो खेळाडू एचएस सोढ़ी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

कांद्याने रडवले ! 5 वर्षांनंतर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक भाव, जाणून घ्या किती किमतीला विकली जात आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बालासाहेब ठाकरे पक्षाचा विश्वासघात करण्याचा संजय राऊतांचा आरोप

पुढील लेख
Show comments