Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Sangali : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

Webdunia
रविवार, 18 जून 2023 (12:16 IST)
सांगली शहरात गोळ्या झाडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलेट वरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी एकाच वेळी आठ गोळ्या झाडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या केली. नालसाब मुल्ला असे या मयत कार्यकर्त्याचे नाव आहे. 

सदर घटना रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. मुल्ला हे काही वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी ते आपल्या घराच्या जवळ बसलेले असता दोन अज्ञात हल्लेखोऱ्यानी शिवीगाळ करत त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण आहे. 

नासलाब मुल्ला यांची  पार्श्वभूमी गुन्हेगारीची होती. त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले होते. घराच्या जवळ बसले असता त्यांच्या वर आठ गोळ्या झाडण्यात आल्या त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांचा मृत्यू झाला. हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पूर्व वैमनस्यातून हे घडण्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबंस्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे सांगली शहर हादरले आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. 
 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतातील या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यातही मांस आणि मद्य प्रसाद म्हणून अर्पण केले जाते

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

श्रावणात चुकूनही या गोष्टी खाऊ नका, नाहीतर रुग्णालयात दाखल व्हायची वेळ येऊ शकते

पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे 5 सोपे योगासन उपयुक्त ठरू शकतात

Parenting Tips: मुलांमधील मोबाईल व्यसन सोडवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

सर्व पहा

नवीन

लँडिंग दरम्यान दोन विमानांची धडक होऊन अपघात

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची15 हजार पोलिसांच्या भरतीला मान्यता

मुंबई कबुतरखाना वाद बाबत मुंबई उच्च न्यायालयात 13 ऑगस्ट रोजी सुनावणी

ठाकरे भावांना मराठी माणसांवर प्रेम नसल्याचा आरोप तहसीन पूनावाला यांनी केला

LIVE: गणेशोत्सवासाठी नागपूरात 415 ठिकाणी कृत्रिम पाण्याचे तलाव बांधले जाणार

पुढील लेख
Show comments