Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिठी नदी स्वच्छता प्रकरणात संजय निरुपम यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले

Sanjay Nirupam
, बुधवार, 28 मे 2025 (15:01 IST)
मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीच्या स्वच्छतेत भ्रष्टाचार उघडकीस आला. मिठी नदीच्या गाळ काढण्याशी संबंधित 65 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
मिठी नदी स्वच्छता प्रकरणात संजय निरुपम यांनी आदित्य ठाकरेंवर ही आरोप केले आहे. ते म्हणाले, या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही चौकशी झाली पाहिजे. 
 
 65 कोटी रुपयांच्या मिठी नदी खोदकाम घोटाळ्यात अटक केलेल्या मध्यस्थाशी असलेल्या कथित संबंधांबद्दल या आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेता डिनोमारियो आणि त्याच्या भावाची आठ तास चौकशी केली. आज पुन्हा एकदा तपास अधिकाऱ्यांनी डिनो मारियोला चौकशीसाठी बोलावले होते.
या प्रकरणी तपासात आढळून आले आहे की आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र चित्रपट अभिनेता डिनो मारियो यांचीही भूमिका असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी डिनो मारिओ आणि त्याच्या भावाची आठ तास चौकशी केली.
 या वर संजय निरुपम म्हणाले, आदित्य ठाकरे आणि डिनो मारिओ हे दोघे मित्र आहे. आणि अनेकदा एकत्र पार्टी करतात.डिनो मोरिया ड्रग्जच्या व्यापारात सहभागी आहे, त्याच्यावर अनेकदा आरोप झाले आहेत."
 
मिठी नदी प्रकरणात डिनोसह आदित्य ठाकरे यांचीही चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी डिनो मोरिया यांना ओपन जिम उघडण्याचे कंत्राट दिले होते. अशा ड्रग्ज व्यापाऱ्याशी आदित्य ठाकरेंचा काय संबंध आहे? डिनो मोरिया शहरातील मोठ्या लोकांना पुरवठा करतो. मग तो मातोश्रीवरही जातो का? याची चौकशी झाली पाहिजे.
संजय निरुपम म्हणाले की, मिठी नदी प्रकरणात डिनो मोरिया कंत्राटदाराच्या संपर्कात होता. एका चित्रपट अभिनेत्याचे एका कंत्राटदाराशी काय संबंध होते? तर मग या प्रकरणात डिनो मोरियाचाही हात आहे का? जर या प्रकरणात दिनो मोरियाचा सहभाग असेल तर आदित्य ठाकरे यांचीही या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे. नदी स्वच्छतेच्या नावाखाली झालेल्या 65 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचीही आदित्य ठाकरे यांची चौकशी झाली पाहिजे.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारत सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला, यावर संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला