Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला आणि किरीट सोमय्या यांना दिला इशारा

Sanjay Raut once again warned BJP and Kirit Somaiya संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला आणि किरीट सोमय्या यांना  दिला इशाराMarathi Regional News  In Webdunia Marathi
, मंगळवार, 8 मार्च 2022 (21:05 IST)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला आणि किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर ईडी आणि आयकर विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, हा नवलानी कोण आहे आणि सोमय्या यांनी वाधवान याच्यासोबत पार्टन कसे ? आदी सवाल  पत्रकार परिषदेत उपस्थित केले. त्याचवेळी त्यांना कारवाईचा इशाराही दिला आहे.
 
नवलानी यांचा किरीट सोमय्या यांच्या सोबत काय संबंध आहे. मुंबईतील 10 बिल्डर कडून कन्सल्टन्सी फी घ्यायचा. दिल्ली, मुंबईमधून हे रॅकेट चालवले जाते आहे. या रॅकटमध्ये भाजपच्या नेत्यांचा समावेश आहे. नवलानी यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त यांना या खंडणी विरोधात एफआयआर केस नोंदवणार आहोत. ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार यात भाजपचे लोक सहभागी झाले आहेत. क्रिमिनल सिंडीकेट नेक्सेससाठी मुंबई पोलीस तपास सुरू झाला आहे.
 
ज्या ईडीला तुम्ही राजकीय विरोधकांच्या मागे लावली आहे. ईडीचे लोक बिल्डर डेव्हलपर यांना घाबरते. पैसे लुबाडले जातात, ही माहिती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. जितेंद्र नवलानी याने  100हून अधिक बिल्डर  डेव्हलपर यांच्याकडून धमकावून पैसे  लुबाडले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीसकडून 125 तासांचे व्हीडिओ जारी, ठाकरे सरकारवर भाजप नेत्यांना गोवल्याचा आरोप