Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नीलम गोऱ्हेचे वक्तव्य विकृती म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

sanjay raut
, सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 (12:34 IST)
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मोठे विधान दिले. त्या म्हणाल्या, ठाकरे पक्षात पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागतात. या वरून राजकारण चांगलंच तापलं आहे. 
नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत नीलम गोऱ्हे यांचावर टीकास्त्र सोडले आहे.
ALSO READ: गडचिरोलीत बाबासाहेबांचा अपमान केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह 2 जणांना अटक
या वेळी त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अपशब्दांचा वापर केला. ते म्हणाले, नीलम गोऱ्हे म्हणजे निर्लज्ज बाई, काही लोकांच्या मर्जीने त्या पक्षात आल्या आणि चार वेळा आमदार झाल्या. पण या बाईचं कर्तृत्व काय? बाळा साहेबांनी मला प्रश्न विचारला होता ही कोण बाई पक्षात आणली आहे. नीलम गोऱ्हे ही विश्वासघातीबाई आहे. त्यांचे वक्तव्य म्हणजे विकृती. 
महाराष्ट्राने नीलम गोर्हेवर हक्कभंग आणावा.पुण्यात उमेदवारी देण्यासाठी नीलम गोर्हे यांनी किती पैसे घेतले असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IIT Baba ची भविष्यवाणी ठरली फेल,विराटच्या खेळीने भारत जिंकला