पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलासा मिळालेला नाही.आता त्यांना 17ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली असून त्याच दिवशी त्यांच्या जामीन अर्जावरही सुनावणी होणार आहे.याआधी न्यायालयाने त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
1 ऑगस्ट रोजी ईडीने त्यांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली अटक केली होती.31 जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्याच्या अनेक ठिकाणी छापे टाकले आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली.यापूर्वी 28 जून रोजी एजन्सीने त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते.पत्रा चाळ प्रकरणात 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नीचेही नाव आहे.ईडीने त्यांना देखील चौकशीसाठी समन्सही बजावले होते.राऊत हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.सूत्रांनी सांगितले की छाप्यादरम्यान ईडीने त्याच्या घरातून 11.50 लाख रुपये रोख जप्त केले होते.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ईडीकडून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची दादरमधील फ्लॅटसह 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.याशिवाय स्वप्ना पाटकर यांच्यासोबत भागीदारीत काही जमीनही होती.संजय राऊतची पत्नी वर्षा यांना आरोपी प्रवीण राऊतची पत्नी माधवी हिने पैसे पाठवले होते, असे ईडीचे म्हणणे आहे.दोघांमध्ये 1 कोटी 6 लाख रुपयांचा व्यवहार झाला होता.