Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 23 May 2025
webdunia

संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितले उद्या धमाका होणार

Sanjay Raut
, गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (15:41 IST)
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती होणार असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. याचा प्रोमो त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. घेण्यात आलेली मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी प्रोमो शेअर करते वेळेस उद्या धमाका होणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. 
 
या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी केली असल्याचे पाहयला मिळत आहे. संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल अशी अनेक ज्योतिष आणि भाकिते वर्तवली जात आहेत अशी विचारणा केली. यासंबंधी उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेले दिसत असून असे बोलणाऱ्यांचे दात पडायला आले आहेत असा टोला लगावला आहे. “सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.
 
“आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतल्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो,” असा इशाराही उद्धव ठाकरे देताना दिसत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाचा, अजित पवार यांनी लॉकडाउनसंबंधी काय बोलले