Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
शिवसेना नेते संजय राऊत हे आज अर्थात सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेणार आहेत. यावेळी सत्तास्थापने बद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. आपल्यापक्षासाठी नव्हे तर मित्रपक्ष भाजपासाठी ते चालले आहेत असे सांगण्यात येत आहे.
जास्त संख्याबळ असलेल्या भाजपाला सत्तास्थापनेची संधी द्यावी अशी विनंती ते करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही सदीच्छा भेट आहे. यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.