कोविड-१९ या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दि. ३० जून २०२१ रोजी आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दि. ११ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-१९ या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांनी त्यांचे पत्र दि.१२ ऑक्टोबर २०२१ अन्वये निर्देशित केलेनुसार जळगाव जिल्ह्यातील कोविड-१९ या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता याप्रमाणे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव टंचाई शाखा, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, संपर्क क्रमांक-०२५७-२२१७१९३/२२२३१८०, ई-मेल- scy.jalgaon@gmail.com असा आहे.