बीड मध्ये दहशत निर्माण करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांचे निकटवर्तीय आणि फरार आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याभाईला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर बेकायदेशीर शिकार आणि हल्ल्याचे गुन्हे दाखल आहे. त्यांना हत्येच्या प्रयत्नासह इतर प्रकरणात उत्तरप्रदेशातील प्रयागराज मधून अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
सतीश भोसले हे गेल्या काही दिवसांपासून फरार होते. त्यांना प्रयागराज येथून अटक केली.
बीड जिल्ह्यात सतीश भोसले यांच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल आहेत, तर एक गुन्हा नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत दाखल आहे.
तसेच त्यांच्याविरुद्ध वन कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाने त्यांना आणि त्यांच्याटोळीला हरणांची शिकार करण्यासाठी लावलेल्या सापळ्याचा विरोध केल्यावर सतीश भोसलेने तरुणाच्या तोंडावर कुऱ्हाडीने वॉर केले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
अलीकडे त्यांच्या एक व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला त्यात ते एका माणसाला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करताना दिसत आहे. त्यांना बीडच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.