Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (07:51 IST)
कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण कसा साजरा करावा, याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. त्यामध्ये यंदाचा उत्सव कसा साजरा करावा तसेच उत्सवाचे स्वरूप यासारख्या गोष्टी यात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
 
- सार्वजनिक नवरात्री उत्सव मूर्ती 4 फूटापेक्षा तर घरगुती 2 फूटापेक्षा मोठी नसावी, देवी मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जन नियमावली पाळावी, मंडपस्थळी सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल. दर्शन रांगेत सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 
- यंदा गरबा, दाांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांच गर्दी न करता आयोजन करावे. 
 
- दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळली जाणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
 
- देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी करण्य संदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
 
- नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेनं दिल्यास स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबव नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments