Festival Posters

दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Webdunia
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रवारी – मार्च २०२० मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च २०२० तर बारावीची परीक्षा १८ फेब्रवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे.
 
या बरोबरच, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.
 
शिक्षण मंडळाचे हे अंतिम वेळापत्रक पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठी आहे. या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra,gov,in अधिकृत संकेतस्थळावर दिनांक १० ऑक्टोबर २०१९ पासून उपलब्ध असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.
 
तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली वेळापत्रक ग्राह्य धरू नये, परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाने छापील स्वरुपात दिलेली वेळापत्रकेच अंतिम असतील. या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून पालकांसह विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

नवीन

LIVE: महात्मा फुले योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफी योजनेतील ‘ती’ अट रद्द

पुण्यात भूमी अभिलेख फेरफार प्रकरणी एसडीएम, तहसीलदार आणि इतर १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

महात्मा फुले योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफी योजनेतील ‘ती’ अट रद्द

महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीच्या अटी शिथिल केल्याच्या निर्णयावर शरद पवारांनी आंनद व्यक्त केला

मोशी कचरा डेपो अपघातात ५० तासांनंतरही ८ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरूच

पुढील लेख
Show comments