मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व विभागांच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीत लिहिण्याची सक्ती केली आहे. शेरा मराठीत लिहिला नसेल तर फाइल परत पाठवली जाणार आहे,' अशी माहिती मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिली. सरकारी व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.
त्यासाठी प्रशासनातील अधिकारी तसेच विभागाच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीतच लिहावा, असे सांगण्यात आले आहे. इंग्रजीत शेरा लिहिला असेल तर फाइल परत पाठविण्याची सूचना ठाकरे यांनी दिल्या असल्याचे देसाई यांनी सांगितले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून सरकारने केंद्राला पत्र लिहिले आहे असेही त्यांनी सांगितले.