Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धबधब्यात मित्राला बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, घरी आल्यावर बनाव रचण्याचा प्रयत्न केला, तिघे पोलिसांच्या ताब्यात

Seeing a friend drowning in a waterfall
, बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (10:19 IST)
मित्रांसह फिरायला गेलेल्या तरुणाचा धीरज (18)चा मृतदेह माहुलीच्या धबधब्यातील पाण्यात तरंगताना आढळला.ही घटना शहापूर तालुक्यातील खोर,पिवळी ची.धीरज कमलेश माळी 17 ऑक्टोबर रोजी भिवंडी कामत घर येथून आपल्या तीन तरुण मित्र आणि त्यांच्या दोन मैत्रिणींसह तीन दिवसा पूर्वी माहुलीच्या जंगलात फिरायला गेला. धबधब्याच्या पाण्यात खेळताना तो पाण्याच्या अंदाज नसल्यामुळे बुडाला. त्याला बुडताना बघून त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न न करता त्याला सोडून पळ काढला घरी आल्यावर त्यांनी घरच्यांना सांगितले की धीरज ला आम्ही भिवंडीत असताना एका मित्राचा फोन आला आणि तो त्याच्यासह निघून गेला. तो कोणासह आणि कुठे गेला हे आम्हाला माहित नाही.
 
धीरजच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. धीरज चा कोठेही पत्ता लागला नाही म्हणून कुटुंबीयांनी नारपोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी धीरजच्या मित्रांना विचारपूस केली आणि त्यांना सोबत घेऊन शोध मोहीम सुरु केली. मित्रांनी पोलिसांना माहुलीच्या जंगलात फिरवून चकवा दिला आणि अंधार झाल्यामुळे पोलिसांना शोध मोहीम बंद करावी लागली. 
 
दुसऱ्या दिवशी पोलिसांनी धीरज सह फिरायला गेलेल्या त्याच्या मित्र आणि मैत्रिणींना सोबत घेऊन पुन्हा शोध मोहीम सुरु केली आणि धबधब्याच्या ठिकाणी गेले असता त्याना धीरजचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. पोलिसांनी धीराजच्या दोन मैत्रिणी आणि एका मित्राला ताब्यात घेतले असून एक मित्र फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता