प्रजासत्ताक दिन राज्यस्तरीय पथसंचलनासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीन स्वयंसेवकांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नाशिक येथील संलग्नीत मोतीवाला होमिओपॅथिक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थीनी कु. रितीका रहान दुबे, औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी कु. अर्णव लिलाधर वढाई व बुलढाणा येथील ए.एस.पी.एम. आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी कु. भगवान भाऊसाहेब साकुंडे यांची राज्यस्तरीय पथसंचलनासाठी निवड झाली आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथील शिवाजी पार्क येथे दि. 26 जानेवारी 2023 रोजी होणाÚया पथसंचलनासाठी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांची शारिरीक व मानसिक क्षमता तपासण्यात येते. निवडप्रक्रियेचे तीनही टप्पे निवड झालेल्या स्वयंसेवकांनी यशस्वीरित्या पुर्ण केले आहेत. तसेच कु. अर्णव लीलाधर वढाई याची राष्ट्रीय स्तरावरील पथसंचलनात प्रतीक्षा यादीत निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, प्रति कुलगुरु डॉ. मिलींद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ व विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, मोतीवाला होमिओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फारुख मोतीवाला, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वानंद शुक्ला, सी.एस.एम.एस.एस आयुर्वेद महाविद्यालयातील प्राचार्य वैद्य श्रीकांत देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी वैद्य बाळासाहेब धर्माधिकारी, ए.एस.पी.एम. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश्वर तु. उबरहंडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. भागवत यांनी मार्गदर्शन केले आहे.