महाराष्ट्राचे माजी आदिवासी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आल्यामुळे तातडीनं नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
त्यांच्या तब्बेतीची माहिती समर्थक आणि कार्यकर्त्यांना मिळाल्यावर नेत्याला पाहण्यासाठी गर्दी केली आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिचड (83) यांना अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी ब्रेन स्ट्रोक आला. यानंतर त्यांना नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.
पाच वर्षांपूर्वी मधुकर पिचड यांनी आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. ते राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जाण्याचा चर्चा सुरु झाल्या आहे.
मधुकर राव पिचड हे 1980 ते 2004 दरम्यान सलग सात वेळा अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेही होते. मधुकर पिचड हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.