Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

खळबळजनक, पत्नीचा गळा दाबून तर चिमुकलीचा गळा कापून खून, स्वतः केली आत्महत्या

खळबळजनक, पत्नीचा गळा दाबून तर चिमुकलीचा गळा कापून खून, स्वतः केली आत्महत्या
, सोमवार, 10 मे 2021 (16:10 IST)
पुणे जिल्ह्यात एका व्यक्तीने बेरोजगारीमुळे पत्नीचा गळा दाबून तर एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुरीने गळा कापून खून केला. दोघांच्या हत्येनंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लोणी काळभोर परिसरात सदरची  घटना घडली आहे.
 
हनुमंत शिंदे या (वय ३८) व्यक्तीने पत्नी प्रज्ञा शिंदे (वय २८) आणि एक वर्षाचा मुलगा शिवतेज शिंदे या दोघांचा खून करून आत्महत्या केली आहे. हे कुटुंब लोणी काळभोरमधील कदम वाक वस्ती येथे वास्तव्याला होते. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात हनुमंत शिंदे ही व्यक्ती पत्नी व मुलासोबत अनेक वर्षापासून राहत होता. गाडीवर चालक म्हणून काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. पण काम नसल्याने अनेक याबाबत पत्नी प्रज्ञा यांनी हनुमंत यांच्या नातेवाईकांना सांगितले होते. पती हनुमंत शिंदे यांना समजून सांगण्याची विनंती त्यांनी नातेवाईकांकडे केली होती.  दरम्यान ९ मे रोजी सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास तारखेला हनुमंत यांने पत्नी प्रज्ञाची गळा दाबून खून केला. तर एक वर्षाचा शिवतेज याचा सुरीने गळा कापला. त्यानंतर घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने हनुमंत याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात