Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये अपघातांचे सत्र , वेगेवेगळ्या अपघातामध्ये ५ ठार

Webdunia
शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (20:55 IST)
एसटीचा भीषण अपघात, महिला वाहकासह एकाचा मृत्यू .नाशिक जिल्ह्यात देवळा-मनमाड मार्गावर एसटीला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये महिला वाहकाचा जागीच, तर एका प्रवासी महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
सदरचा अपघात मनमाड आगाराच्या बसला झाला आहे. चांदवड शहराजवळील मतेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला असून बसमधील २० ते २२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस मनमाड आगारातून सुटून नांदुरीकडे गेली होती. तिकडून परत येत  असताना चांदवड शिवारातील मतेवाडीजवळ अपघात झाला. समोरुन येणाऱ्या वाहनाला कट मारल्यानंतर एसटीचा रॉड तुटल्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस थेट समोरील झाडावर आदळून अपघात झाला. अपघातामध्ये सारिका लहिरे या महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला तर एका महिला प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अपघा बसची एक बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. जखमींना तातडीने चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. 
 
इगतपुरीजवळ खाजगी बसच्या अपघात, एकाचा मृत्यू  12 प्रवासी जखमी
मुंबई नाशिक महामार्गावर शुक्रवारी सकाळी ६.३० वाजेच्या नादुस्त अवस्थेत असलेल्या ट्रकला पाठीमागुन खासगी लक्सरी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यु झाला तर बसमधील चालकासह ११ प्रवाशी गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक सुमारे चार तास ठप्प झाली होती.
 
महामार्गाच्या बोरटेंभे शिवार येथील पोद्दार शाळेसमोर नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा असतांना खबरदारी म्हणून ट्रकच्या आजूबाजूला सेफ्टी कोण लावण्यात आले होते. मात्र पाठीमागून नाशिक दिशेने येणाऱ्या खाजगी ज्वेल फिश ट्रॅव्हल्सची बस प्रवाशांना शिर्डी दर्शनाला घेऊन जाणारी खासगी लक्सरी बसने बंद असलेला ट्रक क्रमांक (एम.एच.o४ एफ.जे ३८०३ ) यास पाठीमागून नाशिक दिशेने जाणाऱ्या बस प्रवाशांना शिर्डी दर्शनाला घेऊन जाणारी खासगी लक्सरी बस क्रमांक ( एम.एच.४८ के.३७१८) चालकाला पुढे असणाऱ्या उभ्या ट्रकचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ट्रक मागे काम करणारा  ट्रक चालक मेहमूद सुभेदार शेख (६०) जागीच ठार झाला तर बसचालक महेंद्र पाल हा गंभीर जखमी झाला असून इतर ११ प्रवासीही जखमी झाले आहे.
 
पिकअप व दुचाकीचा अपघात, दोन चिमुरडे ठार
नाशिक जिल्ह्यातील वणी पिंपळगाव रोडवर  रात्री एक वाजता पिकपअ व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोन चिमुरडे ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे.वणी पिंपळगाव रोडवर पिकअप (क्रमांक एम एच १६ डिके ७७३७) ही पिंपळगाव कडून वणीकडे येत असताना मार्गाच्या कडेला उभे असलेले फॅशन प्रो मोटरसायकलला (क्रमांक एम एच १५ एच डी ३०३४) धडकली. या अपघातात मोटरसायकलवरील व रस्त्यावरील बाजूला उभे असलेले व्यक्ती जखमी झाल्या. तर दोघे चिमुरड्यांचा जागीच मृत्यू झाला. साहिल सुनील शिरसाठ (१५) व स्नेहल सुनील शिरसाठ (१२) हे दोघे सख्खे भाऊ बहीण ठार झाले. जखमी सुनील बापू शिरसाठ (४०) हे त्यांचे वडील व सोनाली सुनील शिरसाठ (३५) ही मुलांची आई असून ते ओझर येथील रहिवासी आहेत. जखमींमध्ये रमनाबाई अप्पा खवळे (५०) यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअप चालक गोकुळ रामहरी शेळके (३०, रा. बोराळे तालुका चांदवड) यास वणी पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

माजी भारतीय पोलो खेळाडू एचएस सोढ़ी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

कांद्याने रडवले ! 5 वर्षांनंतर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक भाव, जाणून घ्या किती किमतीला विकली जात आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बालासाहेब ठाकरे पक्षाचा विश्वासघात करण्याचा संजय राऊतांचा आरोप

पुढील लेख
Show comments