Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावत्र बाप वर्षभरापासून अल्पवयीन मुलीचा करत होता लैंगिक छळ

sexual abuse
औरंगाबाद , मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (19:18 IST)
सावत्र बाप गेल्या वर्षभरापासून अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक छळ करत असल्याची घटना वैजापूरमध्ये उघडकीस आली आहे. या बापासह आणखी एक जण मुलीवर अत्याचार (Minor girl raped) करत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली असून या सगळ्या भयंकर प्रकारासाठी मुलीच्या आईचीही सहमती असल्याचे समोर आले आहे. या सावत्र बापासह अन्य एकजण आणि आई या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
14 वर्षाच्या मुलीवर वर्षभर भयंकर अत्याचार
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी 14 वर्षीय असून ती औरंगाबाद येथील एका वसतिगृहात शिक्षण घेत होती. परंतु तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ती शहरातील मोंढा मार्केट परिसरातील तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. ती गेल्या वर्षभरापासून येथे वास्तव्यास होती. परंतु सावत्र बापाची या मुलीवर वाईट नजर होती. तो तिच्यासोबत वारंवार अश्लील चाळे करत होता. एवढेच नव्हे तर शेजारी राहणारा आणखी एक जणही तिचा लैंगिक छळ करत होता.
 
मुलीने आईला सांगितले तेव्हा….
शेजारी आणि सावत्र बापाचे हे कृत्य मुलीने आईच्या कानावर घातले तेव्हा आईने मुलीची साथ न देता शेजारी जसे सांगतो, तसे कर असे सांगितले. तसेच पीडित मुलीला मारहाण केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

OLA ने 10 वर्षात प्रथमच नफा कमावला, आता IPO द्वारे $1 बिलियन उभारण्याची तयारी