Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करणार

Webdunia
मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (21:30 IST)
शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केलीय. तसंच शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे कायदा लागू करण्याचीही ग्वाही त्यांनी दिली. शनिशिंगणापूर तिर्थक्षेत्रात विश्वस्तांमार्फत मोठा भ्रष्टाचार झाला असून कर्मचारी भरतीतही गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला.  
 
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.  श्री शनिशिंगणापूर तिर्थ क्षेत्रात विश्वस्तांमार्फत मोठा भ्रष्टाचार झालाय. कर्मचारी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
 
कुठलीही जाहीरात न देता कर्मचारी भरती झाली. धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केली आणि निकाली काढली. पण, ती चौकशी झाली नाही. संस्थेचे स्पेशल ॲाडिट करावे लागेल.  सचिव दर्जाच्या अधिका-याला नेमून सर्व तक्रारींची चौकशी करावी लागेल. शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे कायदा लागू करणार असल्याचेही ते म्हणाले.

Edited by -Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

सरकार बनताच 'लाडक्या बहिणींना' मिळणार 2100 रुपये-अमित शाह

महाराष्ट्रात निवडणूक उड्डाण पथकाने गाडी अडवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले, 2 पोलिसांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर

पुढील लेख
Show comments