Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुठले मंत्रिपद हेही ठरलेले, काँग्रेस तयार झाल्यावर शरद पवारांनी शब्द फिरवला

Sharad Pawar changed his mind when the Congress was formed
, गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (21:25 IST)
शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीवरून राज्यात पुन्हा पाहटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. यावर महाविकास आघाडीकडून फक्त संजय राऊत बोलले असले तरी भाजप नेत्यांकडून मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत,
 
भाजप नेते गिरीश महाजन यांनी तर भाजप आणि राष्ट्रवादी काय बोलणी झाली? सत्ता स्थापनेसाठी काय फॉर्म्युला ठरला होता? पवारांनी शब्द का फिरवला? अशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
 
शरद पवार हे आता अर्धसत्य सांगत आहेत, शरद पवारांनी पूर्ण सत्य सांगावं, भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत सर्व चर्चा झाली होती, दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि शरद पवार यांच्या बैठका झाल्या, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत.
 
एवढेच नाही तर या बैठकीत कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं हेही ठरलं होतं, पण जेव्हा काँग्रेस शिवसेनेसोबत यायला तयार झाली तेव्हा शरद पवारांनी आपला शब्द फिरवला, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bengal Corona Updates: ममता सरकारने उचलली कडक पावले, ३ जानेवारीपासून यूकेहून कोलकाता येणा-या फ्लाइटवर बंदी