गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही वारंवार सांगितले आहे की उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी असेही संकेत दिले की लोकांच्या मनात जे असेल ते होईल. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्यातील राजकारणाचे चाणक्य शरद पवार यांनी आपले मत मांडले. पवारांनी स्पष्टपणे म्हटले आहे की राज ठाकरेंच्या सभांमध्ये गर्दी जमते, पण ती मतांमध्ये रूपांतरित होत नाही.
मनसेला मते मिळत नाहीत. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये जमणारी गर्दी मतांमध्ये रूपांतरित होत आहे. त्यात त्यांना यशही मिळत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे दिसून आले आहे.
शरद पवारांच्या मते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक माविआने एकत्रपणे लढवल्या पाहिजे. याचा फायदा माविआला होऊ शकतो. असे ते म्हणाले.