Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Sharad pawar : शरद पवार पुन्हा पावसात भिजले

Webdunia
शनिवार, 8 जुलै 2023 (17:16 IST)
social media
सध्या राज्यात राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यावर राष्ट्रवादीच्या पक्षात फूट पडली. अजित पवार यांनी शिंदे -फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 
 
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या समवेत काही मोजकेच नेता आणि आमदार आहे.आता शरद पवार यांनी एक्शन मोड घेतले आहे. त्यांनी आजपासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून आज ते नाशिकात पोहोचले तिथे ते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहे. राज्यात सर्वत्र पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसात शरद पवार मुंबईहून नाशिकात जाण्यासाठी निघाले. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दरम्यान शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले असल्याचा फोटो सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे.
 
 शरद पवारांचा पावसात भिजलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये "भाग गये रणछोड सभी, देख अभी खडा हूँ मैं, असे लिहिले आहे. सगळे पळकुटे पळून गेले तरी ही मी  अजून उभा आहे, मी ना थकलोय, ना हरलोय रणामध्ये अटळपणे उभा आहे, म्हणत असे भाव मांडले आहे.  

शरद पवार येवल्याच्या दिशेने जात असताना पावसात भिजले. पक्ष उभारणीसाठी राज्य पिंजून काढताना पावसात भिजले आहे . त्याचा परिणाम राजकीय वातावरणावर काय होतो हे बघण्यासारखे आहे.  
   

Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Maharashtra Live News Today in Marathi बुधवार 13 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला रोखून देशद्रोही म्हणण्याचा व्हिडिओ व्हायरल

महाविकास आघाडीच्या बोलण्यात येऊ नका, अकोल्यात म्हणाले योगी आदित्यनाथ

लातूरमध्ये हेलिकॉप्टरची तपासणी,नितीन गडकरींवर निवडणूक आयोगाची कारवाई

मुंबईतील सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घ्या

पुढील लेख
Show comments