Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शरद पवारांनी केले मोठे विधान

sharad panwar
, शुक्रवार, 22 मार्च 2024 (15:30 IST)
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विरोधकांनी त्यांच्या अटकेनंतर केंद्र सरकार तसेच भाजपावर आगपाखड केली. या मुद्यावरून शरद पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 100 कोटींच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास केजरीवाल यांच्या घरी  ईडीची टीम 10वं समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन पोहोचली. तसेच रात्री 9च्या सुमारास  दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ‘आप’तर्फे जोरदार निदर्शनं केजरीवालांच्या अटकेनंतर करण्यात आली. इंडिया आघाडीसह विरोधी पक्षांनीही केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. शरद पवार यांनीही केजरीवाल यांची अटक चुकीची आहे, असे सांगत केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला. देशभरात आपच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी संध्याकाळी ईडीच्या कारवाईनंतर निषेध नोंदवला. केंद्र सरकार आणि भाजपावर कडाडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनीही या मुद्यावरून हल्ला चढवला. केजरीवालांच्या अटकेचा निषेध शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी नोंदवला. शरद पवार यांनी ‘मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानेच केजरीवालांवर कारवाई करण्यात आली ‘ असा आरोप केला. तसेच  भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. शरद पवार यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही केला. भाजपकडून भीती पसरवण्याचे काम निवडणुकीच्या काळात सुरू आहे. आधी हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक केली. तर आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. माहिती नाही उद्या कोणाला अटक करतील. शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला, केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असं म्हणत. ईडीचा वापर करून राज्याच्या काही प्रमुख नेत्यावर कारवाई केली जाते. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून लक्ष्य केलं जात आहे.त्यांना तुरूंगात टाकण्यात येत आहे.ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे.  आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे याआधी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली होती.  शरद पवार म्हणाले की, राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे. तसेच शरद पवार असेही म्हणालेकी, मोदींच्या भूमिकेला  केजरीवाल हे दिल्लीत बसून  विरोध करतात. म्हणून  त्यांच्या विरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणालेत.  

Published By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुलाचा स्लॅब कोसळून भीषण अपघात