Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जपान आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करतंय - शरद पवार

Webdunia
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017 (12:52 IST)

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आली. पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच भविष्याच्या वाटचालीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षांतर्गत लोकशाहीचा अवलंब करण्याच्या उद्देशाने नव्याने सुरू झालेल्या पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांतर्गत शरद पवार यांनीही नोंदणी केली व रू. ५५ फी भरली.

सामान्य माणसाच्या प्रवासातील यातना कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट आणले जात आहेत. या ट्रेनची कारखानदारी जपानमध्ये आहे पण त्याला मार्केट नाही. जपान त्यांची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करतंय, असा आरोप पवार यांनी यावेळी केला. ६ व ७ नोव्हेंबरला कर्जत येथे पक्षाच्या कार्यकारिणी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रत्येक सेल आपापल्या क्षमतेनुसार कामही करत आहेच पण पुढच्या काळात राष्ट्रवादी बुथ लेवलवरही लक्ष देईल, असे प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे   यांनी येथे स्पष्ट केले. नवीन सभासद नोंदणीची कार्यक्रम विद्यार्थी, युवक, युवती, महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हाती घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पदाधिकाऱ्यांनी व्यापक व आक्रमकपणे आंदोलन करावे. पक्षासाठी अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे. एकाच टप्प्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील असा अंदाज आहे. त्यामुळे आपण आताच कंबर कसायला हवी, असे आवाहन पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते  अजित पवार   यांनी केले. केंद्र व राज्य सरकारविरोधात जनतेत एक जनमत तयार होत आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि विविध गोष्टींबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. विधिमंडळात मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले तेव्हा सत्तेतील लोकांनी पळ काढला, हे राज्यात पहिल्यांदाच घडलं. सरकार विरोधात जनमत तयार करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सिंहाचा वाटा आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच विजय होईल, अशी घोषणा करून विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी उपस्थितांना प्रोत्साहन दिले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

कानपूरमध्ये ट्रेन रुळावरून उतरवण्याचा आणखी एक प्रयत्न,लोको पायलट आणि असिस्टंटच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने गुन्ह्याची कबुली दिली

अंधेरीच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बोट उलटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना दिली खास भेटवस्तू

महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या, आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments