Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

Webdunia
मंगळवार, 16 मे 2023 (10:10 IST)
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून 5000 विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. 

येत्या 25 जून ते 5 जुलै 2023 या दरम्यान वारकऱ्यांसाठी विशेष गाड्या धावणार आहे. माऊलीच्या वाखरी येथे रिंगण सोहळ्यासाठी ज्यादाच्या बसेस उपलब्ध करून देणार आहे. 
 
पंढरपूर यात्रेसाठी राज्यातून आणि दूरवरून भाविक आणि वारकरी  येतात त्यांची गैरसोय  होऊ नये या साठी एसटीच्या अतिरिक्त बसेस सोडणार आहे. प्रवाशांचा सोयी साठी पंढरपूरच्या चंद्रभागा, पांडुरंग आयटीआय कॉलेज , विठ्ठल कारखाना आणि भीमा या ठिकाणी तात्पुरती  बस स्थानक उभारणार आहे.या बस स्थानकात सुलभ शौचालय, पिण्याचे पाणी, चौकशी कक्ष, संगणकीय आरक्षण केंद्र, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी सुविधा देण्यात येणार आहे. यात्रेसाठी सुमारे 5000 गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.  
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, जपान-कोरिया यांच्यात पहिला सामना

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

पुढील लेख
Show comments