Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

ग्रामीण विकास, आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित उपक्रम सुरू करून शिंदे एक नवीन ओळख निर्माण करत आहे

eknath shinde
, सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (08:51 IST)
महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्गातर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध विषयांवर चर्चा आयोजित करण्यात आली होती. तसेच चर्चासत्रातील विचारवंतांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विकास अलीकडच्या काळात झपाट्याने वाढला आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित अनेक उपक्रम सुरू केले आहे.
 
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्रीपदाची व्याख्या केवळ सत्ता किंवा अधिकारापुरती मर्यादित राहिलेली नाही, असे लोक म्हणाले. त्यांनी या पदाकडे 'सामान्य माणसाचे' म्हणून पाहिले आहे, ज्यामुळे त्यांचे कार्य अधिक प्रभावी आणि लोकांपर्यंत पोहोचले आहे. तसेच शिंदे यांनी कृषी क्षेत्र, शेतकऱ्यांच्या समस्या, विविध लोककल्याणकारी योजनांमध्ये वैयक्तिक रस घेतला, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे.
 
त्यांच्या राजकीय प्रवासाची कहाणी साध्या पार्श्वभूमीतून सुरू झाली असून, मुख्यमंत्रीपद भूषवतानाही त्यांनी सामान्य माणसाप्रमाणेच जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून स्वत:ला कायम ठेवले आहे.  
 
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित अनेक उपक्रम सुरू केले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्रातील सामान्य लोकांची जीवनशैली सुधारली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपुरात भीषण अपघात, एकाचा मृत्यू