Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अलिबाग समुद्रात अडकलेल्या 14 क्रू सदस्यांची हेलिकॉप्टरने सुटका

Ship stuck in Alibaug sea
, शुक्रवार, 26 जुलै 2024 (11:53 IST)
धरमतर येथून जयगडला निघालेले जहाज अलिबागजवळ समुद्रात भरकटले. या जहाजातील 14 क्रू सदस्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून लिफ्ट करून बचावले आहे.जे एस डब्ल्यू कंपनीचे बार्ज गुरुवारी 25 जुलै रोजी अलिबागच्या समुद्रात भरकटले होते. या जहाजातील सर्व सदस्य सुखरूप आहे.हे जहाज काल 25 जुलै रोजी अलिबाग जवळच्या समुद्रात भरकटले होते. 

आज सकाळी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करून जहाजातील सर्व 14 क्रू सदस्यांना लिफ्ट करून वाचवण्यात यश आले आहे. तसेच हे सर्व क्रू सदस्य फिट असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे जहाज खराब हवामान,दृश्यमानता कमी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भरकटले होते. घटनेची माहिती मिळतातच अलिबागच्या तहसीलदारांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. नंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना सदर माहिती देण्यात आली. जहाजातील क्रू सदस्यांना रेस्क्यू करण्यासाठी  कंपनीची यंत्रणा घटनास्थळी पोहोचली मात्र अंधारामुळे रेस्क्यू करणे शक्य नव्हते. आज सकाळी 26 जुलै रोजी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने लिफ्ट करून त्यांना वाचवले. या जहाजावरील सर्व क्रू सदस्य सुरक्षित आहे. 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र पूर की निवडणुकीची रणनीती?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास स्थानी मध्यरात्री झाली बैठक