Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शिर्डी रेल्वेस्थानक बनले कॅशलेस

शिर्डी रेल्वेस्थानक बनले कॅशलेस
अहमदनगर - साईनगर शिर्डीत रेल्वेस्थानकात कॅशलेस व्यवहारासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व डिजीटल यंत्रणा उभारणीचे काम पूर्ण झाले असून, सोलापूर मध्य रेल्वे विभागात साईनगर शिर्डी पहिले कॅशलेस स्थानक ठरले असल्याची माहिती सोलापूर मध्य रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्याचे आव्हान जनतेला केले होते. 
 
शिर्डीत येणाऱ्या साईभक्‍तांची संख्या लक्षात घेता सोलापूर मध्य रेल्वे विभागाच्या वतीने साईनगर शिर्डी रेल्वेस्थानक कॅशलेस करण्यासाठी पहिले पाऊल उचलले. 
 
या रेल्वेस्थानकात रेल्वे तिकीट, आरक्षित रेल्वे तिकीट, भोजनगृह व पार्सल कार्यालय, आदी ठिकाणी पॉईंट ऑफ सेल ही कॅशलेस मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. साईभक्‍त व रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केले आहे.
 
साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या उंबरठ्यावर साईनगर शिर्डी रेल्वेस्थानक कॅशलेस झाल्याने साईभक्‍तांमधून समाधान व्यक्‍त होत आहे. वर्षभर चालणाऱ्या या समाधी उत्सवासाठी देश-विदेशातील साईभक्‍त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल होणार आहेत. या साईभक्‍तांना रेल्वेच्या कॅशलेस व्यवहाराचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

5 जून रोजी वृक्षारोपण करा