Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेला आणि भाजपला एकत्र येत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करा : आठवले

Shiv Sena and BJP come together and establish power once again: Athavale शिवसेनेला आणि भाजपला एकत्र येत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करा : आठवले Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
, शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (15:41 IST)
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा भाजप सोबत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पुन्हा एकदा साद घातली आहे. शिवसेनेने अजून निर्णय बदलावा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचं असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय एकत्र असले पाहिजेत, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले ते सांगली मध्ये बोलत होते.
अडीच वर्षाचा जो फॉर्मूला होता त्यावर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे एकमत व्हायला काही हरकत नाही. अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं, असेही रामदास आठवले म्हणाले. महाविकास आघाडी सरकार मध्ये अनेक विषयावरती वाद आहेत. भ्रष्टाचारासंबंधीच्या अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये राहणे योग्य नाही, असेही आठवले म्हणाले

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परळी वैद्यनाथ मंदिर समितीला आले धमकीचे पत्र