"शिवसेनेची सभा म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे 25 आमदारही निवडून आले नसते," अशी टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
'शिवसेना म्हणजे गटारातील बेडूक आहे,' असंही महाजन म्हणाले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारी जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, "त्यांनी मतदारांनी उत्तर दिलं आहे. 10 वर्षांपासून देत आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मोठा झाला. सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आमची युती झाली होती. पण आज काय परिस्थिती आहे. आम्हाला जनतेनं सर्वाधिक जागा दिल्या. मोदींवर यांना बोलण्याची गरज नाही. यांची लायकी आहे का?" अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.तसंच शिवसेना सत्ता लंपट असून त्यांनी स्वबळावर 4 खासदार निवडून आणावेत असंही महाजन म्हणाले.