Marathi Biodata Maker

बाळासाहेबांच्या चरणाशी शिवाजी महाराजांची प्रतिमा शिवसेनेची टीका

Webdunia
शनिवार, 7 जुलै 2018 (09:50 IST)
शिवसेनेने रितेश देशमुख यांना बोलण्याआधी स्वत:कडे बघाव, कारण शिवसेना भवनला शिवाजी महाराजांपेक्षा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मोठा तर आहेच, त्या बरोबर बाळासाहेबांच्या चरणाशी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. मग आता शिवाजी महाराजांचा अपमान होत नाही का? असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यावरून पुन्हा राजकारण सुरु झाले आहे. रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या राजसदरेत बसून त्यांनी फोटो काढला होता तर तो इंन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यामुळे तो नुसता ट्रोल होतोय असं नाही तर टीकेचा धनीही झाला आहे. मात्र प्रकरण गंभीर होतंय हे पाहत रितेशने माफी मागितली आहे. शिवप्रेमी कमालीचे संतापलेत आहेत. किल्ले रायगडावर राजे शिवाजींच्या राज सदरेतील मेघ डंबरीवर बसून त्यानं फोटो काढले आहेत. सोबत कादंबरीकार विश्वास पाटील आणि दिग्दर्शक रवी जाधवही दिसतायतत हे फोटो त्यानं सोशल वेबसाईटवर टाकले आणि टीकेची झोड उडाली आहे.  यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागतो आहे. असे रितेश ने स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

पुण्यात स्वयंघोषित बाबाचा भयंकर कारनामा; १५ वर्षे लैंगिक शोषण, लघवी पिण्यास भाग पाडले, पीडितेचा आरोप

तरुणांची आवडती Pulsar 220F आता नव्या रूपात! LED लाइट्स आणि डिजिटल कन्सोलने वाढवला बाईकचा स्वॅग

LIVE: उद्धव यांच्या ६ बंडखोर खासदारांना दिल्लीहून जयपूरला हलवण्यात आले

तुमचा जर एमसीबी वारंवार ट्रिप होत असेल तर या चुका करू नका, अन्यथा आग लागू शकते

Citroen e-C3X भारतात लाँच: प्रीमियम फीचर्स, बॅटरी सबस्क्रिप्शन मॉडेल आणि किंमत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments