Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शिवसेनेतून आणखी दोन बंडखोरांची हकालपट्टी; दुसरीकडे नऊ सेना पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

shivsena
, बुधवार, 13 जुलै 2022 (07:43 IST)
शिवसेनेतून बंडखोरांची हकालपट्टी करण्याचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याचे दिसून येत आहे. संतोष बांगर यांची हकालपट्टी केल्यानंतर आता राजेश शहा आणि रविंद्र फाटक यांची हकालपट्टी आता शिवसेनेनी केली आहे. याशिवाय, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये नऊ पदाधिकाऱ्यांनी राजीनामाही दिला आहे. त्यामुळे शिवसेनेसमोरचे संकट संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे.
 
राज्यातील राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. शिवसेनेला तर जबर धक्का या सगळ्याचा बसला आहे. एकनाथ शिंदे गटानी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्यामुळे बंडखोरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाबाहेरचा रस्ता दाखवत आहेत.
 
पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून याबाबतचं वृत्त प्रसारित करण्यात आलं आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातूनही सांगण्यात आले आहे.
 
शिंदे गटात सामिल होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने ठाकरे आता अदिक सतर्क झाले आहेत. शिवसेना भवनात सतत बैठकाही सुरु आहेत. स्थानिक पातळीवरील नेतृत्वातही बदल करण्यात आले असून पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.
 
हे सगळं सुरु असतानाच दादरमध्ये नऊ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले आहेत. विभागप्रमुख सदा सरवणकर, शाखाप्रमुख संदीप देवळेकर, शाखाप्रमुख संतोष तेलवणे, शाखा समन्वयक अजय कुसुम, उपविभाग समन्वयक कुणाल वाडेकर, शाखाप्रमुख मिलिंद तांडेल, महिला शाखासंघटक अरुंधती चारी, महिला उपविभाग समन्वयक शर्मिला नाईक, शाखा संघटक मंदा भाटकर अशी या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओबीसी आरक्षणासाठी बांठिया आयोग काय आहे त्या अहवालात?