Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक ! महाविद्यालयीन तरुणावर पोलिसानी अनैसर्गिक अत्याचार केला

Shocking! The college youth was subjected to unnatural atrocities by the police धक्कादायक !  महाविद्यालयीन तरुणावर पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार केला Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
, सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (15:33 IST)
सांगलीत पोलीस खात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. सांगली येथील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर यांनी महाविद्यालयीन तरुणास प्रेम प्रकरण उघडकीस आणण्याची धमकी देत अनैसर्गिक अत्याचार केले.  या घटनेची त्यांनी व्हिडीओ क्लिप काढून ती व्हायरल करण्याची धमकी देत तरुणांकडून पैशांची मागणी देखील केली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.पोलीस कर्मचाऱ्यानी केलेल्या पाश्र्विक कृत्यामुळे अवघ्या पोलीस खात्याला काळिमा फासली गेली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आपल्या मैत्रिणीला भेटून त्याच्या वस्तीगृहाकडे जात असताना पहाटे ३ वाजता पेट्रोलिंग करत असलेले हणमंत यांनी त्याला थांबवून  'कुठून येत आहे ?कुठे जात आहेस 'विचारपूस केली. त्यावर तरुणाने मैत्रिणीला भेटून येत आहे असे  सांगितल्यावर मी हे सर्व तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणीच्या कुटुंबियांना सांगेन असे म्हणत त्याच्या बरोबर अनैसर्गिक कृत्य केले आणि या घटनेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पैशाची मागणी केली. पोलिसांनी हणमंत देवकर यांना अटक केली आहे. 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शवागृहात फ्रीजरमध्ये 7 तासांनंतर 'मृत' व्यक्ती जिवंत झाला