Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सांगली महापालिका आयुक्तांना फेकून मारले बूट; लोकशाही दिनात घडला प्रकार

sangli miraj mahapalika
, मंगळवार, 4 एप्रिल 2023 (08:03 IST)
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकाने गेल्या ॥ वषार्पासून त्याची फाईल मंजूर न केल्याने आयुक्तांच्या दिशेने बूट फेकला. यानंतर एकच खळबळ उडाली. . दरम्यान या घटनेनंतर महापालिकेचे सर्व कमची मुख्यालयात जमले होते. त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे महापालिका कायार्लयात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ एकाला ताब्यात घेतले आहे.
 
सांगलीतील कैलास काळे असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. आज सोमवारी महापालिकेतर्फे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सांगलीतील मुख्यालयात हा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी कैलास काळेही उपस्थित होते. त्यांनी गुंठेवारी नियमतीकरणासाठी २०१२ मध्ये फाईल महापालिकेत दिली होती. ती मंजूर न झाल्याने ते संतप्त झाले. यावेळी आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांशी काळे यांचा वाद झाला. त्यानंतर काळे यांनी आयुक्तांच्या दिशेने बूट फेकला. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली.
 
या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख तातडीने फौजफाट्यासह महापालिकेत पोहोचले. त्यांनी काळे याला ताब्यात घेतले. दरम्यान आयुक्तांच्या दिशेने बूट फेकल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी, कमर्चारी मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी या घटनेचा निषेध करत कामबंद आंदोलनाची घोषणा केली. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय शिरसाट यांच्यावर 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा