Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, काळ्या बाजारात 15 हजारांना मिळतेय इंजेक्शन

Shortage of Remedesivir injections
, गुरूवार, 15 एप्रिल 2021 (08:40 IST)
कोरोना बाधीत रूग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठी आवश्यकता आहे.  त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. काळ्या बाजारात रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री केली जाते. एक इंजेक्शन 15 ते 16 हजार रुपयांना विक्री केले जात आहे. या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे.
 
रुग्णालयांनीच रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. परंतु, अनेक खासगी हॉस्पिटलला इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
 
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. आजच्या घडीला दररोज दोन ते तीन हजारांच्या दरम्यान कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यात गंभीर, अतिगंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपयुक्त ठरत आहे.
 
रेमडेसिवीरची मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काळ्या बाजारात त्याची चढ्यादराने विक्री केली जात आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जावे. तिथे गरजू रुग्णांनाच वापरावे. त्यावर जिल्हाधिका-यांनी नियंत्रण ठेवावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या.
 
त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रेमडेसिवीरसाठी कंट्रोल रूमची स्थापना केली. रुग्णालयांनीच रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. ज्यांना इंजेक्शन हवे असतील त्यांनी 020-26123371 किंवा 1077 (टोल-फ्री) या क्रमांकांवर संपर्क साधदण्याचे आवाहन केले आहे. परंतू, कंट्रोल रूम कार्यान्वित असतानाही रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

औरंगाबादमध्ये निर्बंध काळात सलून उघडले, मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू