Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीकांत शिंदे 14 व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित

shrikant shinde
, रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (10:10 IST)
शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आलाय. श्रीकांत शिंदे यांना नुकताच 14 व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 17 व्या लोकसभेत बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून तेलंगणाच्या राज्यपाल तमिळीसई सौंदरराजन यांच्याहस्ते शिंदे यांचा गौरव करण्यात आला.
 
चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि ई मॅगझिन यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या संसद रत्न पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात या पुरस्काराचे वितरण तेंलगणाच्या राज्यपाल तमिळसई सौंदररोजन आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे हंसराज अहिर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश संजय किशन कौल, गृहराज्यमंत्री अजय मिश्रा, संसदरत्न पुरस्कार समितीच्या प्रियदर्शनी राहुल, के.श्रीनिवासन आदी उपस्थित होते.
 
माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार संसद रत्न पुरस्काराची सुरूवात करण्यात आली आहे. संसद रत्न पुरस्कार हा त्याच खासदारांना प्रदान करण्यात येतो, ज्यांचे लोकसभेत उत्कृष्ट काम आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हिरीरिने सहभाग घेणाऱ्या खासदारांना हा सन्मान प्राप्त होतो.
 
डॉ.श्रीकांत शिंदे यांना संसदेतील त्यांच्या कामासाठी यंदाच्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2019-23 या कालावधीत डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत 556 प्रश्न विचारले तर 67 चर्चांमध्ये सहभागी झाले. याशिवाय 12 प्रायव्हेट मेंबर बिल त्यांनी समोर आणले आहे. त्यांची ही कामगिरी लक्षात घेता केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली समितीने शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
 
तर हा पुरस्कार प्रदान करताना तेलंगणाच्या राज्यमाल तमिळसई सौदंरराजन म्हणाल्या की, ‘मला जेव्हा या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं तेव्हा आश्चर्य वाटलं की सर्व खासदारांमध्ये माझं नक्की काय काम ? केवळ पॉवरफुल व्यक्ती म्हणून मी इथे आले नाहीये तर माझ्याकडे असणाऱ्या मतदानाचा पॉवरफुल हक्काच्या जोरावर मी आज या कार्यक्रमाला हजर राहिले आहे. हा खासदारांचा दुसरा महत्त्वाचा पुरस्कार आहे, कारण त्यांच्या जनतेने त्यांना आधीच निवडून देत त्यांना पुरस्कार दिला आहे. महिला राज्यपालाने वुमन रिझर्व्हेशन बिल पास केले आहे, याचा आनंद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Edited By -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : काय म्हणता आता टोमॅटोच्या नावाखाली परदेशात कांद्याची तस्करी, वाचा संपूर्ण बातमी