Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणून राज ठाकरे यांना रांगोळी आवडत नाही

So Raj Thackeray does not like rangoli  म्हणून राज ठाकरे यांना रांगोळी आवडत नाही Marathi Regional News In Webdunia Marathi
, शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (15:22 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करतो. याचा अर्थ आज ती साजरी करू नये असा होत नाही. महाराजांची जयंती एक दिवस नव्हे तर वर्षाचे ३६५ दिवस साजरी करावी असे त्यांचे कर्तृत्व आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मुंबईतल्या चांदिवली येथे मनसे शाखेचे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. 
 
यावेळी ते म्हणाले मला रांगोळी आवडत नाही असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. पण, आज इथे काढलेली ही रांगोळी मी इथून गेल्यानंतर सर्वानी पहा असं म्हणत राज ठाकरे यांनी रांगोळी कलाकाराचं कौतुक केलं. ही एकच कला अशी आहे कि जी मला आवडत नाही असं ते म्हणाले. याचं कारण सांगताना ते म्हणाले, कोणत्याही कार्यकमाला, सभारंभाला मोठ्या हुशारीनं कलाकार रांगोळी काढतो. पण, कार्यक्रम आटोपला को ती पुसावी लागते. त्यामुळे मला रंगोली आवडत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ईडीच्या नावाने धमक्या देणं याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार : विनायक राऊत