यूपीएचं अध्यक्षपद आता शरद पवारांकडे देण्याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं. यावर "शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा आणि त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. यूपीएच्या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर मी बोलणं योग्य ठरेल", असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर, पुन्हा एकदा राऊत यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांनी या बातमीत तथ्य नसल्याचं सांगितल्याचं मी ऐकलंय. पण, जर अधिकृतपणे यासंदर्भात प्रस्ताव आला तर आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा राहिल. सध्या राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस कमकुवत आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन युपीएला ताकद देण्याची गरज असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय.