Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर – फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

Some ministers in the state have recovery software - Fadnavis makes serious allegations against the government Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
, शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (17:10 IST)
राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.राज्यात इतकी प्रचंड दलाली सुरू आहे… खरं म्हणजे ही दलाली इतक्या स्तरावर पोहोचली आहे की, काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे असं आयटीच्या छापेमारीत लक्षात येत आहे. हे महाराष्ट्रात सुरू असेल तर ईडी, सीबीआय राज्यात येणारच. जनतेशी बेईमानी करुन सत्तेत देवेंद्र फडणवीसांनी पुढे म्हटलं, मुख्यमंत्रिपदी असल्याने ठाकरे विसरले, जनतेने भाजपला नाकारलं नाही.
 
जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारले. जनतेशी बेईमानी करुन तुम्ही सत्तेत आलात. जनतेशी बेईमानी करत शिवसेना, ठाकरे सत्तेत आहे. मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होत, मुख्यमंत्रिपदाची महत्तवाकांक्षा लपून राहिलेली नाही.
 
मुख्यमंत्रिपदाची महत्तवाकांक्षा पूर्ण झाली आम्हाला दोष देऊ नका. एकूणच कालच्या मेळाव्यात ना विचार होतं, ना सोनं होतं. कालच्या मेळाव्यात केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्टेशन हे त्यांच्या तोंडून बोलत होतं. असंगाशी संग केला तर अशाच प्रकारचं फ्रस्टेशन होईल आणि शाच प्रकारचं वक्तव्य निघेल. मी केवळ इतकंच सांगतो भाजपला नामोहरण करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्ही सत्ता वापरील, पैसा वापरली तरी देखील नंबर एकचा पक्ष भाजपच होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सीजच्या विरोधात ईडी, सीबीआय याचं भय कुणाला असेल? ज्याने काही केलं असेल त्याला भय असेल. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एजन्सीजच्या वापराच्या विरोधात आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Fake banking apps: आपल्या मोबाईल फोन मध्ये असे अॅप तर नाही त्वरितच तपासा, अन्यथा बँक खाते खाली होईल