Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांदा व्यापारी संघटनेत फूट; "या" बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी सुरू केले लिलाव

Webdunia
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (08:19 IST)
कांदा व्यापारी संघटनेमध्ये दोन गट पडले असून त्यातील एका गटाने आजपासून विंचूर बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू केले आहे. मात्र उर्वरित बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत. त्याबाबत अद्याप व्यापाऱ्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही.
 
दिनांक 20 सप्टेंबर पासून नाशिक जिल्ह्यातील सतरा बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव हे बंद होते. केंद्र सरकारने लागू केलेली 40 टक्के निर्यात शुल्क मागे घ्यावे ही व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसह अजून काही मागण्या असल्या तरी जरी प्रत्यक्षात निर्यात शुल्काची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत लिलाव प्रक्रियेमध्ये भाग न घेण्याचा निर्णय नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने घेतला होता.
 
परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा समझोता झाला नाही. त्यामुळे आज नऊ दिवसानंतरही हा संप सुरू होता. परंतु व्यापारी असोसिएशन मध्ये फुट पडली असून जिल्ह्यातील विंचूर या उप बाजार समिती मधील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या बाजार समितीमध्ये लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
 
त्याप्रमाणे आज गुरुवारपासून त्यांनी या ठिकाणी लिलाव सुरू केले. या ठिकाणी कांद्याला प्रतिक्विंटल 2100 रुपये भाव मिळाला आहे. मात्र उर्वरित सोळा बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी आपला बंद हा कायम ठेवला आहे. त्यामुळे आता सध्या सुट्टी असल्यामुळे लिलाव प्रक्रिया बंद आहे. मात्र ही प्रक्रिया 3 ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर इतर बाजार समिती व्यापारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 दिल्लीत बैठक
दरम्यान कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा पियुष गोयल यांनी व्यापाऱ्यांना दिल्लीत येण्याचे आमंत्रण दिले असून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी म्हणून  29 सप्टेंबर रोजी कांदा व्यापारी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची बैठक होणार आहे. यामध्ये राज्य सरकारचे एक प्रतिनिधी मंडळ देखील उपस्थित राहणार आहे तसेच केंद्रातील अधिकारी आणि काही मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महिलेने एकाच वेळी 4 बाळांना दिला जन्म, कुटुंबात आनंदाचे वातावरण

महाराष्ट्रात वीज पडून 2 महिलांसह 7 जण जखमी

महाराष्ट्र विधान परिषदेतील मनोनीत आमदारांची नावे ठरली; भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळतील?

बेंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले

हे म्हातारं थांबणार नाही, निवडणुकीपूर्वी शरद पवार गर्जले

पुढील लेख
Show comments