Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

SSC Result 2019: दहावीचा निकाल जाहीर, 77.10 टक्के विद्यार्थ्यांना यश, या प्रकारे पाहा दहावीचा निकाल

maharashtra 10th result
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात 77.10 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी यंदा निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. निकालात तब्बल 12 टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.

सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 88.38 टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 67. 27 टक्के लागला आहे. एकूण 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी 12 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

विभागवार टक्केवारी
 
पुणे विभाग 82. 48 टक्के
नागपूर विभाग 67.27 टक्के
औरंगाबाद विभाग 75.20 टक्के
मुंबई विभाग 77.04 टक्के
कोल्हापूर विभाग 86.58 टक्के
अमरावती विभाग 71.98 टक्के
नाशिक विभाग 77.58 टक्के
लातूर विभाग 72.87 टक्के
कोकण विभाग 88.38 टक्के
 
प्रथम श्रेणीमध्ये 4 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
 
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. 
 
नवीन अभ्यासक्रमानुसार होणारी ही पहिलीच परीक्षा होती. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी होती. 1 ते 22 मार्चला झालेल्या परीक्षेसाठी 999 केंद्र संचालक तर ठाणे, रायगड, पालघर, दक्षिण, उत्तर, पश्चिम मुंर्बत मिळून ७५ परिरक्षक नियुक्त केले होते.
 
 
निकालासाठी संकेतस्थळ
 
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
hscresult.mkcl.org
 
 
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल आणि प्रिंट आऊटही घेता येईल.
 
या प्रकारे पाहा निकाल –
वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
संकेत स्थळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
आसनक्रमांक टाका
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल
 
वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना 1 वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून 57766 या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमृता फडणवीस यांचा चॅरिटी शो मध्ये सहभाग