Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसटी बसने चिमुरडीसह चौघांना चिरडले

At Koshimbe fork in Bhiwandi taluk on Mumbai Nashik highway
, सोमवार, 23 जानेवारी 2023 (11:06 IST)
मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यात कोशिंबे फाट्यावर रास्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकीस्वाराला तसेच रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दोघांना एका एसटीबसने चिरडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 20 जानेवारी रोजी दुपारची आहे मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यात कोशिंबी फाट्यावर एक दुचाकीस्वार आपल्या ६ वर्षाच्या चिमुकलीसह रास्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या एसटी बसच्या तावडीत आले आणि चिरडले गेले या घटनेत दुचाकीस्वार जयवंत ठाकरे आणि त्यांच्या मागे बसलेले त्यांचे मित्र या दोघांना चिरडले. तसेच अभिजित जाधव आणि त्यांची सहा वर्षाची चिमुकली जिज्ञासा जाधव हे रास्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे होते. वेगाने येणाऱ्या बसने त्यांना धडक दिली त्यात जिज्ञासा आणि तिचे वडील जखमी झाले असून जिज्ञासाच्या डोक्याला मार लागला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हाय अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून बस हलकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरक्कोनममध्ये मंदिराच्या कार्यक्रमादरम्यान क्रेनचा भाग कोसळून चार ठार, नऊ जखमी