suvichar
✕

ST Bus Accident भीमाशंकरला जात असलेली एसटी बस पुलावरुन ओढ्यात कोसळली

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2023 (11:34 IST)
ST Bus Accident गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये बसला अपघात झाला आहे. बस पुलावरुन थेट ओढ्यामध्ये कोसळली पण सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. घटनाची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य सुरु आहे.
 
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे ही घटना घडली जेथे गिरवली येथील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून ही एसटी बस 20 फूट खोल ओढ्यात कोसळली. बसमध्ये तेव्हा 35 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी दोन जण गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 
 
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

मुंबई ते कोकण प्रवास होणार आणखी सोपा! लवकरच नियमित विमानसेवा सुरू होणार, नितेश राणेंची घोषणा

LIVE: मुंबई ते कोकण प्रवास होणार आणखी सोपा! लवकरच नियमित विमानसेवा सुरू होणार

महाराष्ट्रात मतदारांपैकी ९९.४१ टक्के मतदारांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले

महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक! उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत पदोन्नती थांबवण्याचे सरकारचे निर्देश

सर्व काही नवीन खरेदी करणे आवश्यक नाही; या ५ गोष्टींवर नक्कीच पैसे वाचवा

पुढील लेख
Show comments