एसटी संप गेल्या तीन महिन्यापासून सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात एसटीचे विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. अद्याप या वर काही निर्णय लागला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांचे आर्थिक स्थिती कोलमडून गेली आहे. गेल्या काही दिवसात यावर काही निर्णय होईल. काहीतरी चांगले घडेल या आशेवर एसटी कर्मचारी बसले आहे. मात्र अद्याप या बाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यावर नैराश्याने आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल घेतविहिरीत उडी मारून आपले आयुष्य संपविले आहे. मुजफ्फर खान असे या मयत कर्मचाऱ्याचे नाव असून ते परभणीच्या जिंतूर आगारात बस चालक म्हणून कामाला होते. त्यांनी भोगावं च्या शिवारातील विहिरीत उडी मारून आपलं आयुष्य संपविले.
एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी चे राज्यात विलीनीकरण व्हावे अशी मागणी घेत संप पुकारला आहे. या संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडून घेली आहे. लोक कर्जबाजारी झाले आहे. अशा परिस्थितीत संप सुरु असताना कोर्टाचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागेल अशी अपेक्षा मुजफ्फर यांना होती. परंतु या वर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नैराश्यात त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या निधनाची वार्ता समजतात आंदोलनकर्त्यांनी त्यांचा मृतदेह आंदोलनस्थळी आणण्याचा प्रयत्न केला. या वर आंदोलनकर्ता आणि पोलिसात वाचावाची झाली.