राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एक महिना उलटून गेला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मात्र आता यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे. सरकार शेतकरी आणि सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेत आहे.येत्या 3 दिवसांतच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत.
शिंदे गटातील 40 बंडखोर आमदार आहेत. अशावेळी सर्वांना मंत्रिपदं देणं शक्य नाही काही जणांना महामंडळ दिले जातील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात जवळपास 42 मंत्री केले जाऊ शकतात. यामध्ये भाजप कोट्यातील 27, शिंदे कोट्यातील 13 आणि काही अपक्ष आमदारांचा समावेश आहे,
दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास पहिल्या टप्प्यात 19 मंत्री असतील. यामध्ये भाजपचे 12 आणि शिवसेनेचे 7 मंत्री असतील. मंत्रिमंडळाचा विस्तार एकाच टप्प्यात झाला तर 26 भाजपकडून आणि 14-15 जण शिंदे गटामधून मंत्री केले जातील.अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.