Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनी आवाहन केलं

Webdunia
रविवार, 15 ऑगस्ट 2021 (11:11 IST)
आज भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन आहे.हा अमृत महोत्सव संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजधानी दिल्लीच्या लालकिल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला.आणि देशाला संबोधित केले.
 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या मंत्रालयात ध्वजारोहण केले गेले.या वेळी महाराष्ट्राला संबोधित करत ते म्हणाले.की यंदाचे वर्ष कोरोनाच्या सावट खाली आहे,पण पुढचा स्वातंत्र्य दिन कोरोनामुक्त होऊन साजरा करू.या साठी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हे जनतेचं कर्तव्य आहे.'कोरोनाला महाराष्ट्रातून आणि या देशातून मुक्त करण्याचे संकल्प आपण घेऊ या.' राज्यात लसीकरणाची मोहीम वेगाने सुरु आहे.राज्यात काल साडे नऊ लाख लोकांची लसीकरणाची नोंद झाली आहे. 
 
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध जरी शिथिल केले आहे तरी कोरोना आपल्या मधून गेलेला नाही, कोरोना अद्याप आहे.कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक नियमाचं काटेकोर पालन जनतेनं करावं.सामाजिक अंतर राखणे,हाताला वारंवार धुणे,मास्क वापरणे,सेनेटाईझरचा वापर करणे.या सर्व नियमांचं पालन करून आपण स्वतःला आणि इतरांना कोरोनाचा बळी जाण्यापासून रोखू शकतो.  
 
कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले, तरी काळजी घेऊनच राहायचे आहे.असं काहीही करू नका जेणे करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल आणि पुन्हा लॉक डाऊन लावावे लागतील.लॉक डाऊन लावल्याने सर्वसामान्यांचे हाल होतात.त्यामुळे सुजाण नागरिक बनावे आणि दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

पुढील लेख
Show comments