Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तापमानात झपाट्याने बदल, मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट

Webdunia
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (10:12 IST)
राज्याच्या तापमानात सध्या झपाट्यानं बदल आहे. किनारपट्टीच्या भागात मुंबईसह कोकणात सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीय. कोकण विभाग वगळता राज्याच्या इतर भागांत सध्या रात्रीच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाल्यानं थंडी पुन्हा अवतरलीय.
 
उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेने पुन्हा येऊ लागलेत. किनारपट्टीच्या भागात मात्र उष्ण वाऱ्यांचे प्रवाह आहेत. परिणामी कोकण विभागात सध्या कमाल तापमानात वाढ झालीय. किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी वाढलाय. मुंबईत गुरुवारी मोसमातील सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. 
 
गेल्या तीन वर्षांतलं ते सर्वाधिक तापमान आहे. तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १६ ते १७ अंशांवर गेलेले किमान तापमान दोन दिवसांपासून १२ ते १३ अंशांवर आलंय. कमाल तापमानही सरासरीखाली आल्यानं उन्हाचा पारा घसरलाय. नाशिकमध्ये राज्यातल्या नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

नीरज चोप्राने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवले

दिग्गज स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी अल्बी मॉर्केल यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

पाकिस्तानच्या कोळसा खाणीत मोठा अपघात, स्फोटात ३२ कामगार ठार

LIVE: महाराष्ट्र सरकार कडून 'अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत ७ हजार कोटी रुपयांना मंजुरी

भिवंडी मध्ये चार मजली इमारत कोसळली, 5 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

पुढील लेख
Show comments