suvichar

नराधम बापाचे कृत्य अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Webdunia
नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. महिला बाहेर नाही तर घरात सुरक्षित नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे. 
 
पुणे जिल्ह्यातील मरकळ (ता. खेड) येथे एका नराधम सावत्र बापाने त्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी घडली असून, फिर्यादी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आरोपी आणि फिर्यादी महिला हे एकाच कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून दिवस आणि रात्रपाळीमध्ये काम करत होते. फिर्यादी महिलेचा आरोपीसोबत मंदिरात विवाह लावून देण्यात आला होता. रविवारी आरोपी रात्रपाळी करुन घरी परतला. त्यावेळी मुलीची आई दिवसपाळीमध्ये कामाला गेली होती. घरात पीडित मुलगी आणि सावत्र वडील दोघेच होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत सावत्र बापाने मुलीवर बळजबरी करत बलात्कार केला आहे. जेव्हा या मुलीची आई संध्याकाळी नोकरीवरून परत घरी आली तेव्हा पीडित मुलीने याबाबत तिला सर्व सांगितले. त्यानंतर आईने थेट आळंदी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. 
 
आरोपी हा मूळचा मध्यप्रदेशचा असून मुलीची आई अरुणाचल प्रदेश येथील आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

परिसीमन विधेयकावरून शरद पवार यांच्या पक्षात मतभेद निर्माण

इंग्लंडचे माजी कर्णधार युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर' पुरस्कार विजेत्या केविन कीगन यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

LIVE: लंडनमध्ये जागतिक मराठी केंद्र उभारले जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लंडनमध्ये जागतिक मराठी केंद्र उभारले जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मोटोरोला एज 70 मॅक्स भारतात 5000 रुपयांच्या सवलतीसह लॉन्च, 7100mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 5 आणि एआय फीचर्ससह उपलब्ध

पुढील लेख
Show comments